मातृत्वाचे स्वप्न साकारणारे ठाण्यातील…ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअर

मातृत्वाचे स्वप्न साकारणारे - ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअर

“आईपण”-“मातृत्व” हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. आजच्या काळामध्ये १५ ते २०% स्त्रियांना हे स्वप्न साकार करण्यासाठी झगडावे लागते आहे. ज्याला “इनफर्टिलिटी” किंवा “व्यंध्यत्व”  असे संबोधले जाते. योग्य वेळी आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ही समस्या लवकरात लवकर सुटू शकते.

मातृदिना निमित्त याबाबतीत ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअरच्या फर्टिलिटी स्पेशालिस्ट डॉ. स्नेहल ढोबळे – कोहळे यांच्याशी चर्चा झाली.

1. आजकाल व्यंध्यत्वाची समस्या वाढते आहे हे खरे आहे काय? कशामुळे?

आजकालची बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव, आहारामधील बदल, वाढता ताण तणाव यामुळे व्यंध्यत्वाची समस्या वाढते आहे.

2. यासाठी तज्ञ डॉक्टरांकडे जाणे खरोखर आवश्यक आहे का?

ज्या वेळी तुम्ही आई – बाबा होण्याचा निर्णय घेता त्याच वेळी तज्ञ डॉक्टरांचा (फर्टिलिटी स्पेशालिस्टचा) सल्ला आणि मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांकडे येणे याचा अर्थ व्यंध्यत्व समस्या आहे असा नव्हे तर सुरुवातीचे हे समुपदेशन पुढील समस्या रोखण्यास उपयोगी ठरते.

3. स्त्रियांच्या वाढत्या वयाचा काही परिणाम होऊ शकतो का?

आजच्या प्रगतशील जीवनशैलीमध्ये, स्त्रीचे मातृत्वामध्ये पदार्पण करण्याचे वय पुढे जात आहे. जसे जसे स्त्रीचे वय वाढत जाते तसे स्त्री बिजांची संख्या कमी होणे, स्त्री बिजांची कमजोरी येणे ह्या समस्या येऊन गर्भधारणेसाठी उशीर होऊ शकतो किंवा गर्भ खराब होऊ शकतो.

4. प्रत्येक स्त्रीचे मातृत्वाचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल?

  1. जीवनशैलीमध्ये खालील चतु:सुत्री प्रयत्नपूर्वक अमलात आणावी – समतोल आहार, नियमित व्यायाम, ताण-तणावापासून मुक्तता आणि सकारात्मक दृष्टिकोन
  2. योग्य वेळी, होणाऱ्या आई-बाबांनी एकत्रितपणे तज्ञांकडून मार्गदर्शन आणि तपासणी करून घ्यावी
  3. तज्ञांच्या सल्ल्यानुसार योग्य त्यावेळी उपचार करावेतसुविधा
  • टेस्ट ट्युब बेबी (आय. व्ही. एफ.)
  • आय. यु.आय.
  • स्त्री बीज व शुक्रजंतु संवर्धन (फ्रिझींग) (कर्करोग पिडीत रुग्णांसाठी देखील)
  • सर्व प्रकारच्या प्रसूती सुविधा
  • मातांसाठी सुसज्ज अतिदक्षत विभाग
  • नवजात बालकांसाठीच्या सुविधा
  • सर्व प्रकारच्या दुर्बिण शस्त्रक्रिया

आजकालच्या पुढारलेल्या आणि नवीन तंत्रज्ञानामुळे कितीही अडथळे आले तरी मातृत्वाचे स्वप्न साकार होऊ शकते. शिक्षण, नोकरी अशी उंच उंच यशाची शिखरे गाठताना स्त्रीयांना आता मातृत्वापासून वंचित राहण्याची गरज नाही. आयव्हीएफ (IVF) ह्या तंत्रज्ञानामुळे योग्य वेळी स्त्री बीज  संवर्धित (EGG FREEZING) करून काही वर्षांनंतर गर्भधारणा करणे आता शक्य आहे. संपर्क:- ७५०६६४४३३० / ७०३५८०११११

पत्ता:- ओव्हा फर्टिलिटी आणि वुमन केअर

पहिला मजला, वेदांत हाॅस्पिटल, कासारवडवली, घोडबंदर रोड, ठाणे (पश्चिम).

वेबसाईट : www.theovacare.com

Published in Loksatta Newspaper on 09th May 2021 (Mother’s Day) – 
https://epaper.loksatta.com/m5/3087449/loksatta-mumbai/09-05-2021#page/15/1[/vc_column_text][/vc_column][/vc_row]

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top